Pimpri News: महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकपदी प्रमोद भोसले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांची ‘एसआरए’मध्ये बदली झाली असून त्यांच्या जागी प्रमोद भोसले यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. भोसले यांनी आज (सोमवारी) पदभार स्वीकारला.

आमोद कुंभोजकर यांची सन 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य लेखापरीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली होती. त्यांचा महापालिकेतील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. राज्याच्या वित्त विभागाने कुंभोजकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्र येथे उपसंचालक (लेखा) बदली केली आहे. त्यांना महापालिका सेवेतून आज कार्यमुक्त करण्यात आले.

त्यांच्याजागी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती बालभारती पुणे येथील सहसंचालक प्रमोद भोसले यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदभार देखील स्वीकारला. भोसले यांनी यापूर्वी महापालिकेत मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी म्हणून कामकाज केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.