Pimpri News: महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप खोत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप खोत यांची निवड करण्यात आली.

महापालिका ज्युनियर इंजिनिअर असोसिएशनची वार्षिक बैठक पालिकेच्या लोखंडे सभागृहात पार पडली. मावळते अध्यक्ष जयकुमार गुजर यांचे अध्यक्षतेखाली 21 नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत संदीप खोत यांनी विजय संपादन केला. असोसिएशनच्या सचिवपदी संतोष कुदळे, खजिनदारपदी महेंद्र देवरे ,कार्याध्यक्षपदी सुनील बेळगावंकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.