Pimpri News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सर्जा राजा’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन ‘सर्जा राजा’ बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजयुमो जिल्हा विद्यार्थी आघाडीचे ग्रामीणचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण, शिरुर शहर भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस अनिकेत राक्षे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवाना बैलजोडी सजवलेले छायाचित्र (फोटो) व एक मिनिटांचा बैलजोडी सजवलेला व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवायचा आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बैलजोडी सजवलेले छायाचित्र व व्हिडिओ 9139047776 / 9561929995 या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी (शहर व ग्रामीण) ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या मानकरी स्पर्धकाला आकर्षक रोख रक्कम तसेच भव्य चषक देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.