Pimpri News: शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवारपासून सुरु होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्या (गुरुवार) पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. दरम्यान, पावणे दोन वर्षांनी शाळा पुन्हा किलबिलाटाने गजबजनार आहेत.

राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची मान्यता दिली होती. परंतु, कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आला. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यास मान्यता दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आता 16 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित कराव्यात. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता करावी. ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवावे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. कोरोना नियमांबाबत पाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.