Sangvi News : गॅस चोरीचा आणखी एक प्रकार उघड; पिंपळे सौदागर येथे गॅस चोरी प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकण, वाकड येथे गॅस चोरी करणा-यांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस चोरी करताना पोलिसांनी काहींना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी जागा मालकासह एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.

बालाजी मलप्पा वाघे (वय 31, रा. समर्थ कॉलनी, रहाटणी, धनराज मलप्पा वाघे (वय 28, रा. सुयोग कॉलनी, रहाटणी), सुरेश राजकुमार म्हेत्रे (वय 25, रा. रहाटणी), (एमएच 14 एएस 5720) या गाडीचा चालक काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय 49, रा. वेताळनगर, चिंचवड), (एमएच 14 एझेड 6064) या गाडीचा चालक अतिष अंबादास कसबे (वय 28, रा. रहाटणी चौक, रहाटणी), शुभम रघुनाथ गवळी (वय 27, रा. पवनानगर, रहाटणी), वंदना गॅस एजन्सीचा चालक-मालक, गुरुप्रसाद इंण्डेन गॅस एजन्सी (औंध) याचा चालक-मालक आणि जागेचा मालक कोकणे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सामाजिक सुरक्षा पथकातील महिला पोलीस नाईक वैष्णवी विजय गावडे (वय 35) यांनी मंगळवारी (दि. 14) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथील आदित्य गॅस दुकानाच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या खोलीत गॅस चोरी करताना मिळून आले. आरोपींनी आपसांत संगनमत करून सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता घरगुती गॅस सिलिंडरमधून काही गॅस काढून घेताना मिळून आले. तसेच इतर आरोपींनी त्यांना या कामात अप्रत्यक्षरित्या मदत केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.