Pimpri News : तेलंगणाच्या धर्तीवर ठाकरे सरकारने मागासवर्गीय समाज बांधवांना मदत करावी :अमित गोरखे

एमपीसी न्यूज – मागासवर्गीय कुटुंबातीतील एका सदस्याच्या बँक खात्यावर सरकारच्या वतीनं 10 लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा तेलंगणा सरकारनं केली आहे. त्याचधर्तीवर महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय समाज बांधवांना मदत करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात गोरखे यांनी म्हटले आहे की, मागासवर्गीय कुटुंबातीतील एका सदस्याच्या बँक खात्यावर सरकारच्या वतीने 10 लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा तेलंगणा सरकारने केली आहे. या योजनेमुळे मागासवर्गीय कुटुंबांना आत्मविश्वास मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतील. तेलंगणा राज्याच्या धर्तीवर ठाकरे सरकारने सुद्धा ही योजना अमलात आणावी.

या माध्यमातून राज्यातील गरीब मागासवर्गीय जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देण्याचे काम करावे. राज्यात गरीब जनतेचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत. सध्या राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे सरकार एक चांगला निर्णय घेईल, अशी अपेक्षा असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.