Pimpri news : रहाटणीच्या तरुणाची लष्करात निवड झाल्यामुळे महापौरांनी केला सत्कार

एमपीसी न्यूज : भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेल्या विश्वेश चव्हाण याचा सत्कार (दि. 5) रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

रहाटणीचा हा तरुण संगणक अभियंता असून त्याने भारतीय लष्कराच्या एसएससी-टेक (55) एन्ट्रीच्या गुणवत्ता यादीमध्ये देशातून पाचवी रॅंक मिळवली आहे. पुढील शिक्षणासाठी तो चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग ॲकेडमी येथे जाणार असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तरुण पिढीसमोर देशासाठी लढण्यासाठी विश्वेशने एक आदर्श उभा केला असून, त्याच्या यशाचा सार्थ अभिमान असल्याची भावना महापौर ढोरे यांनी व्यक्त केली.

हा सोहळा महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडला. यावेळेस पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, सविता खुळे, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, उद्योजक संतोष जगताप आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.