_MPC_DIR_MPU_III

Ind Vs Aus Test Series : नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

एमपीसी न्यूज – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना उद्यापासून ( गुरुवार, दि. 7) सुरू होत आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या सामन्यासाठी गोलंदाज नवदीप सैनीला संघात संधी देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेली बॉर्डर गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत उद्यापासून सुरू होत आहे. भारतीय संघात यावेळी मोठे बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे तर, गोलंदाज नवदीप सैनी देखील या सामन्यातून कसोटी पदार्पण करणार आहे.

असा आहे भारतीय संघ –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी

_MPC_DIR_MPU_II

भारतीय संघातून यापूर्वी दुखापतीमुळे उमेश यादव आणि केएल राहुल हे दोघेजण मालिकेतून बाहेर गेले आहेत. रोहित शर्माचा संघात समावेश झाल्याने भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ तयारीनिशी उतरणार हे निश्चित, त्यामुळे या सामन्याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.