Cricket News : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टी-20, वन-डे, कसोटी संघ जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Cricket News) अगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये खेळण्यात येणाऱ्या टी-20, वन-डे आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या तीन वेगवेगळ्या मालिकांसाठी 3 कर्णधार निवडण्यात आले आहेत. टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुर्यकुमार यादव कडे, वन-डे मालिकेसाठी के एल राहुल तर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा नियमित कर्णधार रोहित शर्मा सांभाळणार आहे.

येत्या 10 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दौ-यासाठी भारतीय संघ 6 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित आणि विराटने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून विश्रांती घेतली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

दुसरी सर्वात मोठी बातमी म्हणजे हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार असेल. तर सूर्यकुमार यादवला वनडे संघात ठेवण्यात आले नाही. वनडे फॉरमॅटमध्ये, विश्वचषक स्पर्धेत या खेळाडूची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर टीम इंडियाने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची टीम इंडियात निवड केलेली नाही.

ऋतुराज गायकवाड आणि प्रसिद्ध कृष्णा यांचीही कसोटी संघात निवड झाली आहे. दीपक चहरचे टी-20 संघात पुनरागमन (Cricket News) झाले आहे. संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, आवेश खान, दीपक चहर, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर यांनी वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे.

Pune : फांदी पडून झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, ईशान किशन, जितेश शर्मा, रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, केएल राहुल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी (फिटनेसवर अवलंबून) जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

                                  भारताचा  दक्षिण आफ्रिका दौरा  2023-23 –  टी-20,  वन-डे, कसोटी मालिका
DayDateMatchVenue
Sunday10-Dec-231st T20IDurban
Tuesday12-Dec-232nd T20IGqeberha
Thursday14-Dec-233rd T20IJohannesburg
Sunday17-Dec-231st ODIJohannesburg
Tuesday19-Dec-232nd ODIGqeberha
Thursday21-Dec-233rd ODIPaarl
Tuesday26-Dec-23 to 30-Dec-231st TestCenturion
Wednesday03-Jan-24 to 07-Jan-242nd TestCape Town

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.