Pune : फांदी पडून झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – कसबा पेठेत अभिजित राजेंद्र गुंड (Pune) यांचा डोक्यात फांदी पडून 26 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात पुणे महापालिकेकडे धोकादायक झाडाबद्दल तक्रार नोंदवली होती. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली.महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत अभिजीत राजेंद्र गुंड यांच्या कुटुंबीयांना पुणे महापालिकेकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांना हे मागणीचे पत्रक दिले. यावेळी राष्ट्रवादीचे गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, एड. स्वप्नील जोशी, केतन औरसे, कामठे, सौरव गुंजाळ उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मृत अभिजीत राजेंद्र गुंड यांच्या पाठीशी आई व भाऊ असे कुटुंब असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

Pimpri : सेंट पॅट्रिक्स, लोयोला, पीसीएमसी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

या धोकादायक झाडा बद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महापालिकेला कल्पना दिली होती. तरीही प्रशासनाच्या (Pune) निष्काळजीपणामुळे नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत अभिजीत राजेंद्र गुंड यांच्या कुटुंबीयांना पुणे महानगरपालिकेकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.