Pimpri News: लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडायला मुभा देण्याची गरज – अजित पवार

एमपीसी न्यूज – ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना टप्प्या-टप्प्याने बाहेर पडायला मुभा देण्याची सुरुवात करायला पाहिजे असे माझे व्यक्तिगत मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क रहावे. नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ”केंद्र सरकारकडून लसीचे वाटप केले जाते. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्राला लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. लस उपलब्ध झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही”.

”वास्तविक जुलैपासून लसीचे उत्पादन वाढेल आणि मुबलक लस मिळेल असे सांगितले. परंतु, लस उपलब्ध झाली नाही. लस मिळण्यासाठी सतत केंद्रांकडे पाठपुरावा सुरु आहे. लस घेण्याची सर्व नागरिकांची मानसिकता दूर झाली आहे. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे”.

”फोन टॅपिंग प्रकरण गंभीर आहे. काय झाले. कोणाच्या काळात झाले. कोण जबाबदार आहे. कोणी आदेश दिले. याची माहिती जनतेला कळाली पाहिजे. यात राजकारण न आणता चौकशी करावी”, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.