Pimpri News : फ्रुट पार्टीच्या माध्यमातून मुलांना रोपं तयार करण्याचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – फ्रुट पार्टीच्या माध्यमातून मुलांना वृक्ष रोपं तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

स्नेहछाया बालक अनाथ आश्रम, दिघी व पुनरुत्थान समरसता गुरुकुल, चिंचवड याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुलांना फळापासून सोप्या पद्धतीने रोपे कशी तयार करू शकतो व का केली पाहिजेत, याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक फळांच्या बिया सांभाळून ठेऊन दरवेळेस त्यातून रोप तयार करावे हे शिकवण्यात आले. आश्रमातील मुलांनी अगदी उत्साहाने यात सहभाग नोंदवला व दरवर्षी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योगदान देणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, पूजा आल्हाट, पंकज शर्मा, जयदीप कर्पे, चिटणीस रवी जांभुळकर, प्रकाश चौधरी, सोशियल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, प्रियांका शाह सिंग, अर्पिता कुलकर्णी, दिगंबर गुजर, सुहास आढाव, प्रमोद पठारे, अनिकेत देवरमानी तसेच संजय गायकवाड व दत्तात्रय इंगळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.