Pimpri corona News: शिवसेनेच्या मातोश्री कोविड केअर सेंटरचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते रविवारी उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने थेरगाव येथिल कैलास मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटर’ चे उद्‌घाटन रविवारी (दि. 9 मे) दुपारी एक वाजता शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळा कदम, खासदार अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये शिवसेनेच्या वतीने मोफत सुविधा पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या सेंटरमध्ये सत्तर कोरोना रुग्णांची आयसोलेशनची (विलगीकरण) व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष व महिला वॉर्ड उभारण्यात आला आहे. येथे दाखल होणा-या रुग्णांवर उपचार करण्यासाठी चोविस तास सहा डॉक्टर, दहा परिचारीका, वॉर्ड बॉय तसेच आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या वतीने सर्व रुग्णांना मोफत दोन वेळचा चहा, जेवण, सकाळी नाष्टा, पाणी देण्यात येणार आहे. तसेच गरम पाणी, रुग्णवाहिका, वाय – फाय सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.