DRDO News : DRDO च्या ‘या’ औषधामुळे कोरोना रुग्णांची ऑक्सिजनची गरज कमी होणार

एमपीसी न्यूज – डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसन ॲन्ड अलायड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर ॲन्ड मॉलिक्युलर बायोलॉजीने एकत्रितपणे एक औषध तयार केलं आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज कमी होणार आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोनावर उपचारासाठी या औषधाला मंजुरी दिली आहे.

2-deoxy-D-glucose (2-DG) असं या औषधाचं नाव आहे. डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला औषधाच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पार पडलं आहे. ज्या रुग्णांना या औषधाची मात्रा दिली होती. ते रुग्ण लवकर बरे झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्या रुग्णांना ऑक्सिजन गरज जास्त भासली नसल्याचंही निदर्शनास आलं आहे. रुग्णही लवकर बरे होत असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना रिपोर्ट नसतानाही रुग्णालयात दाखल करता येणार

रुग्णांला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी कोरोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे बदल केले आहेत. त्यानुसार रुग्णांला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. तसेच, एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.