Pimpri : कुख्यात शाहबाज कुरेशी टोळीवर ‘मोक्‍का’ अंतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कामगिरी

हितेश मूलचंदानी खून प्रकरण

एमपीसी न्यूज – अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या शाहबाज कुरेशी टोळीने पिंपरीत हितेश मूलचंदानी यांचा खून केला. या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मोक्‍का) कारवाई केली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिनाभरात पोलिसांनी आठ टोळ्यांना मोक्‍का लावल्याने गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

शाहबाज सिराज कुरेशी, (वय 22, सुरती मोहल्ला, खडकी बाजार, पुणे) अभय ऊर्फ लिंगा संजय भोसले, (वय 25, निशीगंधा अपार्टमेंट, शितोळेनगर, जुनी सांगवी), योगेश ऊर्फ लंगडा विठ्ठल टोम्पे (वय 20, रा. सुभाष जगताप चाळ, पिंपळे गुरव), अरबाज मन्त्रा शेख (वय 20, रा. खडकी बाजार पोलीस चौकी जवळ, खडकी), दोन अल्पवयीन मुले अशा एकूण सहा जणांवर पोलिसांनी मोक्‍काची कारवाई केली आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून खडकी आणि पिंपरी परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण केली. यासाठी आरोपींनी पिंपरीत हितेश मूलचंदानी यांचा खून केला.

_MPC_DIR_MPU_II

टोळीप्रमुख शाहबाज कुरेशी यांच्यावर खून, सरकारी नोकरास मारहाण, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी गर्दी, मारामारी अशा एकूण 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अक्षय भोसले याच्यावर 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर योगेश टोम्पे आणि आरबाज शुख याच्यावर दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच अल्पवयीन मुलांवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीने वर्चस्वासाठी तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे एकत्रितरित्या गुन्हे केल्याने त्यांच्यावर मोक्‍काची कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींवर मोक्‍काची कारवाई होण्यासाठी पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक शंकर बाबर, सहायक आयुक्‍त श्रीधर जाधव, उपायुक्‍त स्मिता पाटील यांच्या मार्फतीने आरोपींच्या विरोधात मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठविला. त्यास पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी मंजूरी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली. या प्रस्तावाकरिता पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांनीही विशेष मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.