Chinchwad : राहत्या घरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. ही घटना काकडे पार्क, चिंचवड येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

विद्या सूर्यकांत घोडेकर (वय 48, रा. बन्सल रेसिडेन्सी, काकडे पार्क, चिंचवड), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या यांचे पती सूर्यकांत हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी विद्या या झोपलेल्या होत्या. सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास ते परत आले असता विद्या यांनी साडीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले आपल्या बेडरूमध्ये झोपलेली होती.

विद्या यांना त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like