BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महापालिका कर्मचाऱ्यांना ‘कम्प्युटर’चे बेसिक ज्ञान आवश्यक

प्रमाणपत्र सादर करावे लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ पासून ‘क’ श्रेणीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संगणक हाताळणी आणि वापराबाबतचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना ‘कम्प्युटर’चे बेसिक ज्ञान घेतले असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ श्रेणीतील वयाची 50 वर्षे पूर्ण केलेले आणि वाहनचालक वगळून सर्व अधिकारी, कर्मचा-यांना संगणक हाताळणी आणि वापराबाबतचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमाणपत्र सादर न करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

यासंदर्भात प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ मधील अधिकारी, कर्मचा-यांनी प्रमाणपत्र द्यावे असे म्हटले आहे. तसेच गट ‘ड’ पदावरील कर्मचा-यांना संगणक हाताळणी किंवा वापराबाबतचे ज्ञान असण्याची आवश्यकता नसल्याने हा आदेश त्यांना लागू होणार नाही.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3