Pimpri: महापालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार अदिती निकम यांना जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्त्या अदिती निकम यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. या पुरस्काराचे वितरण जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी होणार आहे. याबाबतची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना महापालिकेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यासाठी अर्ज मागविले जातात. आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय समिती पात्र उमेदवाराची निवड करते.

  • यंदा सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी 6 अर्ज आले होते. त्यातील एक अर्ज अपात्र ठरला होता. तर, सहा अर्ज राहिले होते. मुलाखती घेऊन त्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या अदिती निकम यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

निकम यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यामुळे निकम यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.