Lonavala : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या जॉब प्लेसमेंटमधून 1945 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकर्‍या

एमपीसी न्यूज – सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे आतापर्यंत झालेल्या जॉब कॅम्पस प्लेसमेंटमधून जवळपास 1945 मुलांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे आणि अजूनही कॅम्पस प्लेसमेंट चालू आहे. या कॅम्पस प्लेसमेंटमधून दोन हजारपेक्षा अधिक मुलांना नोकरी मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझंट आणि एटलसकोपकोया कंपन्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे. आतापर्यंत मिळालेल्या नोकरीपैकी सर्वाधिक वार्षिक पॅकेज १२ लाख रुपयांचे असून सरासरी पॅकेज ४.१ लाखाचे आहे.

  • प्लेसमेंट झालेल्या 1945 पैकी १३३३ मुलांना अक्सेंचर (७७५) इन्फोसिस (२८९), कॉग्निझंट (२६९) मध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यांचे वार्षिक पॅकेज ३.५ लाख ते ४.५ लाख एवढे आहे. सिंहगड संस्थेची विशेष बाब म्हणजे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन खूप प्रभावी आहे.

औद्योगिक आणि शैक्षणिक संबंध चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यामध्ये प्रोफेसर जे. एन. पितांबरे यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे औद्योगिक आणि शैक्षणिक संबंधामुळे टिकून आहे. सिंहगडचे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या खूप उत्कृष्ट आहेत. ही बाब आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नमूद केली आहे, असे सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे यांनी सांगितले आहे.

आत्तापर्यंत झालेले प्लेसमेंट हे अतिशय समाधानकारक आहे, असे सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्लेसमेंट डीन प्रोपेसर पितांबरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.