Pimpri: मतदार जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघात आज (रविवारी) काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत सायकलस्वार, सायकलप्रेमी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 
मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज सकाळी पावणेसात वाजता डॉ. हेडगेवार भवन आकुर्डी येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड मार्गे परत आकुर्डी येथे संपन्न झाली.

  • सायकल रॅलीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत,  सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, प्रसिध्दी समितीचे रमेश भोसले, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक, तानाजी सावंत तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ व वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

त्याचप्रमाणे सायकल मित्र संस्था – साहय रायडर्स मित्र परिवार, निसर्ग सायकल मित्र , इंडो सायकल क्लब,सायकल मित्र, गांधीपेठ तालीम मित्र मंडळ चिंचवड, ज्येष्ठ नागरिक संघाचे सूर्यकांत मुथियान व संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड यांनी देखील त्यांचे कार्यकर्त्यांसह सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.

  • सायकल रॅलीमध्ये मतदारांना मतदान करण्याबाबतच्या घोषणा असलेले फलक सायकलवर लावून तसेच मतदान करण्याच्या घोषणा देत रॅली संपन्न झाली. ”आता करणार नाही कसलीही आशा, पवित्र मतदान घडवू, हिच लोकशाहीची भाषा” अशा घोषणा दिल्या. डॉ. हेडगेवार भवन येथे मतदान करण्याची सामूहिक शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.