Maval : संकल्प फौंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने उर्से गावांत मतदार जागृती रॅली

एमपीसी न्यूज -संकल्प फौंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा, उर्से याच्या संयुक्त विद्यमानाने मावळ तालुक्यातील उर्से गावामध्ये मतदानाची मोहीम राबवण्यात आली. यासाठी गावामध्ये मतदार जागृतीसाठी रॅली काढण्यात आली.

यावेळी ‘चला मतदार होऊ, लोकशाहीला प्रबळ करू’, मतदारराजा जागा हो’, लोकशाही अधिक बळकट करू’ आशा अनेक घोषणांनी संकल्प फौंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से यांनी उर्से ग्रामस्थांमध्ये मतदार जागृतीचा संदेश दिला.

  • यावेळी प्रदीप मारुती धामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि रॅली पार पडली. यावेळी भारत ठाकूर, बाळासाहेब धामणकर,जयसिंग ठाकूर, दादाभाऊ धामणकर, अशोक ठाकूर, रोहिदास धामणकर, पोलीस पाटील गुलाब आंबेकर, प्रल्हाद धामणकर, मुख्याध्यापिका काळे, विद्यार्थी व सर्व शिक्षक वृद्ध आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.