Pimpri: वाढत्या उन्हामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; ग्राहकांची थंडपेय विक्रीच्या दुकानावर गर्दी

एमपीसी न्यूज – उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. दुचाकीस्वार यांनी या रणरणत्या उन्हापासून बचाव करण्याकरीता ऊपरणे, टोप्या, डोक्यावर घेऊन प्रवास करीत आहेत. बाजारात सकाळी दहा वाजताच उन्हाच्या झळा अधिक प्रमाणात जाणवत होत्या. शरीराला गारवा मिळावा म्हणून अनेकजण ऊसाचा रस तसेच थंडगार ज्युस, लस्सी घेणे पसंद करीत असल्याचे आढळत होते. तसेच ताक, मठ्ठा विक्र ीत वाढ झाली असून ऊस रसवंती केंद्रावर तुफान गर्दी पाहायला मिळत होती. शिवाय टरबुज खरेदीवर अनेकांचा विशेष कल होता.

पुणेकरांनी काल गेल्या 36 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस अनुभवला. तर, शहरात काल 42.6 अंश सेल्सियस इतक्या या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात कमान तापमान 40-41 अंशांच्या आसपास राहिले आहे. अजून तीन दिवस तरी उष्णतेची ही लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला होता.

आज वाढत्या तापमानामुळे पारा 42.9 सेल्सिअस अंशावर गेला गेला आहे. त्यामुळे उकाडयापासून मुक्ती मिळवण्यासाठी ए.सी, कुलर,पंख्यांचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. तर शीतपेयांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून टोपी, गॉगल, सनकोटचा वापर करणे पसंद केले आहे.

  • तर, रणरणत्या उन्हामुळे दुपारी 1 ते 4 या वेळेत रस्त्यावर गर्दी तुरळक होताना दिसत आहे. दरम्यान, कडक उन्हामुळे परिसरातील रस्त्यासह विविध दुकानात आता टोप्या, गॉगल्स, चष्मे, रूमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हॅन्डग्लोज विक्रीसाठी आले असून हे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी करीत आहे.उन्हामुळे घशाला पडणारी कोरड घालविण्यासाठी लिंबू सरबत, ऊसाचा रस, मठ्ठा आदी थंडपेयांची मागणी वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.