Pimpri : पूरग्रस्तांना मदतीचे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार, सभासद यांना कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यात आलेला महापुरात सर्वस्व गमावलेल्या आपल्या बांधवाना पुन्हा उभे करण्यासाठी आपणाकडून यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

आपण आपली मदत पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनाचे नावाने (cross Cheque) चेकच्या स्वरुपात संघटनेच्या कार्यालयात आणून द्यावी . किंवा संघटना कर्मचारी 1) भानुदास औटी (मो.नंबर ९८८१४५०२२५), 2) सतीश आरेकर (७०३८००७७२५), 3) तातेराव आडे (७३५०१७२४५६) यांच्याकडे देऊन रीतसर पावती घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.