Pimpri News : पिंपरी चौकातील पीएमपीएमएल बस थांबा कोसळला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य भवनजवळ असलेला पिंपरी पीएमपीएमएल बस थांबा कोसळला. बस थांबा उन्मळून पडला असून त्यात तीन प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) दुपारी घडली.

पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य भवन जवळ जुना पुणे मुंबई महामार्गावर असलेला पीएमपीएमएलचा बस थांबा शुक्रवारी दुपारी उन्मळून पडला. हा बस थांबा थेट रस्त्यावर पडला. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बस थांब्याच्या मागील बाजूने केबल वायर अंथरण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यात बस थांब्याचे फाउंडेशन सैल होऊन बस थांबा रस्त्यावर कोसळला असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. दरम्यान बीआरटी बस स्टॉप देखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उन्मळून पडलेल्या बस थांब्यावर नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली आहे. असे असले तरी तिघेजण या घटनेत जखमी झाले आहेत. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.