Pimpri : केंद्र सरकारच्या अन्नधान्य महामंडळ सल्लागार समिती सदस्यपदी पोपट हजारे

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या अन्नधान्य महामंडळ सल्लागार समिती सदस्यपदी पिंपरी-चिंचवड भाजपा शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांची निवड करण्यात आली आहे.

पोपट हजारे हे पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष असून चिंचवड येथील टाटा मोटर्स (टेल्को) या कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याची दखल म्हणून त्यांना या पदावर काम करण्याची संधी दिली आहे.

हजारे हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. पक्षवाढीसाठी त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.