Pimpri : पिंपरी उपबाजार विभाग प्रमुखपदी रोहिदास शिंदे

एमपीसी न्यूज –  कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, पिंपरी (Pimpri) उपबाजार विभाग प्रमुखपदी रोहिदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.

Talegaon Dabhade : तळेगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

रोहिदास शिंदे यांनी या पूर्वी पिंपरी, चिंचवड, मोशी, खडकी या ठिकाणी काम केले. मार्केटयार्ड येथे भाजीपाला विभाग बाजार निरीक्षक म्हणून ते काम पहात होते.  शिंदे म्हणाले की, पिंपरी फुलबाजार, भाजी मंडई येथे जास्तीत जास्त सुविधा देण्यावर माझा भर असणार आहे.

शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  बाजारामध्ये एकसुत्रता रहाण्यासाठी अधिकाधिक भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी (Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.