Pimpri : रा. स्व. संघातर्फे आज सायंकाळी 21 ठिकाणी शस्त्रपूजन, दसऱ्याला 10 ठिकाणी पथसंचलन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वतीने आज (रविवारी) सायंकाळी 21 ठिकाणी शस्त्रपूजन व व्याख्यान होणार आहे. तसेच विजयादशमीनिमित्त मंगळवारी 8 ऑक्‍टोबर रोजी शहरात 10 ठिकाणी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहर संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.

यंदा शहरातील विजया दशमीच्या दिवशी केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हा दिवस संघ स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्ताने शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज (रविवारी) विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिंचवड गावातील मोरया गोसावी क्रीडा संकुल याठिकाणी आज सायंकाळी साडे सहा वाजता डॉ. अशोक कुकडे यांचे याख्यान होईल. तसेच सायंकाळी सात वाजता पिंपरी गावातील रॉयल मिलेनियम शाळेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकर्ते मकरंद ढवळे यांचे व्याख्यान होईल.

संत तुकारामनगर मधील एसएनबीपी शाळेत संध्याकाळी साडेसात वाजता प्रांत कार्यकर्ते प्रकाश मिठभाकरे, इंद्रायणीनगर येथील ग्लोरिअस पार्क येथे पाच वाजता पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, याच वेळी आकुर्डीतील कामायनी शाळा येथे प्रांत बौद्धिक मंडळाचे सदस्य योगश्वर घोगले, देहूगाव येथील छत्रपती शिवाजी चौक येथ साडे पाच वाजता पिंपरी-चिंचवडचे संघ सहकार्यवाह बाळासाहेब लोहकरे यांचे व्याख्यान होणार आहे.

तरुण स्वयंसेवकाचे पथसंचलन

विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे दहा ठिकाणी तरुण स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे.

यामध्ये देहूरोड येथील विकासनगर, निगडीतील रूपीनगर, चिखलीतील पुर्णानगर, खराळवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवडगाव या भागांचा समावेश आहे. यापूर्वी शहरात 5 ठिकाणी पथसंचलन व्हायचे. यावेळी नव्याने 5 ठिकाणी संचलन होणार असल्याची माहिती संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.