Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काल (रविवारी) पुण्यामध्ये ( Pune) झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालक पदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली. संघाच्या रचनेत दर तीन वर्षांनी शाखा प्रतिनिधींकडून अशी निवड केली जाते.

नानासाहेब जाधव यांनी कृषी अभियांत्रिकीच्या मृद् व जलसंधारण(Soil and Water Conservation) या विषयातील पदव्युत्तर (एम.टेक.)शिक्षण पूर्ण केले आहे.शिक्षणानंतर ते पुणे जिल्ह्यातील मावळशिरूर या तालुक्यांना व त्यानंतर जळगाव जिल्हा प्रचारक म्हणून सहा वर्षे संघाचे पूर्ण वेळ(प्रचारक) काम केलेले आहे.

Pimpri : भाजप उद्योजक आघाडी महिला अध्यक्षपदी उत्कर्षा जितेंद्र कुलकर्णी

त्यानंतर ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालाय धुळे येथे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.त्यानंतर ते म.फु.कृषी विद्यापीठाच्या राहुरी येथील प्रक्षेत्र संचालनालयडॉ.आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय,वनशेती संशोधन प्रकल्प राहुरी येथे प्राध्यापकशास्त्रज्ञ या पदांवर कार्यरत होते.

2012 साली कृषी विद्यापीठातून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संघात शाखा मुख्याशिक्षकजिल्हा शारिरीक प्रमुख,या पदांवर कार्य केले.प्रचारक म्हणून निवृत्त झाल्यावर जिल्हा सहकार्यवाहविभाग सहकार्यवाहविभाग कार्यवाह, 2001 पासून पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाहप्रांत कार्यवाह अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

2011 ला प्रांत सहसंघचालक पदांवर व 2013 ला प्रांत संघचालक या पदावर नियुक्ती झाली. 2015  त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मा. संघचालक या पदावर निवड झाली.तेव्हा पासून ते ही  जबाबदारी सांभाळत आहेत. आता पर्यंत त्यांची 2015,2018, 2021 आणि आता पुन्हा 2024 अशी चार वेळा प्रांत संघचालक पदावर निवड झालेली ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.