Pimpri: देशाच्या ऐकतेसाठी रन फॉन युनिटी महत्वाची – महापौर जाधव

शहराच्या ऐकतेसाठी धावले पिंपरी चिंचवडकर

एमपीसी न्यूज – भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतींनी जोडलेला आहे. या देशात अनेक सण-उत्सव साजरे होत असतात. ही परंपरा इतिहासापासून जोडलेली आहे. एकता ही देशाची ताकद असून देशातील एकता कायम राखण्यासाठी ‘रन फॉन युनिटी’ महत्वाची असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शहरात स्पाईन रोड, चिंतामणी चौक ते वाल्हेकरवाडी अशी राष्ट्रीय एकता दौडचे बुधवारी (दि. 31) सकाळी साडेसहाच्या सुमारास महापौर जाधव, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या हस्ते पांढरा झेंडा दाखवून दौडला सुरुवात झाली. दौडच्या सुरुवातीला राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. एक भारत श्रेष्ठ भारत, धावेल भारत, जोडेल भारत… अशा घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या.

या दौडमध्ये सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, नगरसेवक शीतल शिंदे, भाजपा प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, उद्योजक मिलिंद चौधरी, किरण चौधरी, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, मनपाच्या क्रीडा विभागप्रमुख आशा राऊत, प्रशासकीय अधिकारी नीळकंठ पोमण यांच्यासह वाल्हेकरवाडी मनपा शाळा, काळभोर नगर मनपा शाळेतील 1800 विद्यार्थी, महिला-पुरुषांनी या रॅलीत सहभाग घेतला. एकता दौडचे संयोजन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले होते.

एकता दौडच्या माध्यमातून देशाची अखंडता, परंपरा जपून, देशाला समृद्धीकडे नेण्याचे आवाहन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड समारोप कार्यक्रम प्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशासाठी मोठे योगदान असून त्यांनी देशातील नागरिकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे नगरसेवक शीतल शिंदे म्हणाले.

देश घडतांना ज्या व्यक्तींचे योगदान आहे. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंडीत ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे. सगळयांना एकाच धाग्यात गुफण्याचे काम त्यांनी केले. सरदार या नावातच त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. म्हणूनच आज राष्ट्रीय एकता दिनाचे व राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आहे. प्रत्येक नागरिकाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृध्द करावे, असे मत पक्षनेते एकनाथ पवार यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.