Pune : ‘शिवगर्जना’मुळे निओसिम कंपनी आणि कामगार यांच्यात वेतनवाढ करार

एमपीसी न्यूज – तळेगाव-ढमढेरे, पुणे येथील निओसिम इंडिया लिमिटेड आणि शिवगर्जना कामगार संघटना, पुणे यांच्यामध्ये दुसरा वेतन वाढीचा करार गुरुवारी, (दि.18) शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात झाला. हा करार तीन वर्षासाठी लागू आहे, अशी माहिती शिवगर्जना कामगार संघटना युनियनचे मेम्बर अमित लांडगे यांनी दिली आहे.

या करारात खालीलप्रमाणे बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
1) ३ वर्षासाठी 11,000/- रुपये इतकी भरघोस पगारवाढ देण्यात आलेली आहे. हा करार दि.१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी लागू असेल. प्रथम वर्षासाठी रक्कम – 7,000/-, 2) द्वितीय वर्षासाठी रक्कम – 2,000/-, 3) तृतीय वर्षासाठी रक्कम – 2,000/- रुपये इतकी असेल. 2) फरक (एरियस्) शंभर टक्के देण्याचे मान्य केले आहे. 3) अटेंडन्स अलाउन्स (CTC व्यतिरिक्त), संपूर्ण महिना हजर – 1000/- रुपये देण्यात येणार आहे.  4) कॅंटीन सुविधा – चालू असलेल्या सुविधा ही 1,320 रुपये होती. त्यामध्ये बदल करून सर्व कॅंटीन कुपन 455 रुपये झाली आहे. 5) गणवेश – प्रत्येक वर्षी २ जोड़ ड्रेस, प्रत्येक वर्षी 2 टी शर्ट आणि एक सेफ्टी शूज देण्याचे मान्य केले आहे. 6) टर्म लोन -(बिगर व्याजी) 25,000 रुपये देण्याचे मान्य केले. 7) मेडिक्लेम पॉलिसी 3 लाख रुपये रक्कम ठेवण्यात आली आहे. (यात स्वतः कामगार, आई-वडील,पत्नी, मुले आदी यांचा समावेश आहे.) ग्रुप अँक्सिडेंट पॉलिसी 5,50,000 लाख रुपये करण्यात आली आहे.

हा करार यशस्वी करण्यासाठी युनियनच्या वतीने कामगार नेते आणि शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक संतोष अण्णा बेंद्रे यांनी प्रयत्न केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.