Pimpri : ज्येष्ठ नागरिकांनी लुटला अभिवाचनाचा आनंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड निवृत्त संघटनेच्या सभासदांचा वाढदिवस समारंभ नुकताच चिंचवड विरंगुळा केंद्रात उत्साहात साजरा झाला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व कथाकार राज अहेरराव लिखित मोत्याची माळ या कथेचे अभिवाचन ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे , ज्येष्ठ लेखिका व नाटककार रजनी राज अहेरराव आणि कवयित्री माधुरी विधाटे यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव आणि ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, उपाध्यक्ष रजनीकांत बेलसरे, कोषाध्यक्ष रमेश इनामदार व उषा गर्भे आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.