Pimpri : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांकडून स्वच्छता दूत, वाहतूक स्वयंसेवक म्हणून सेवा

एमपीसी न्यूज – गणपती विसर्जनावेळी (Pimpri ) प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांकडून स्वच्छता दूत, वाहतूक स्वयंसेवक म्हणून सेवा बजाविण्यात आली. यंदाच्या गणपती विसर्जन सोहळ्याला परतीच्या पावसाने हजेरी दिली.

प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकर वाडी पवनानदी घाट, थेरगाव घाट, मोरया गोसावी मंदिर चिंचवड परिसर, पिंपरी घाट, मळेकर वस्ती पुनावळे घाट,चिखली शाहूनगर, तळवडे, पूर्णानगर, सांगवी या परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनास गर्दी दिसून आली.

या सर्व ठिकाणी नागरिकांना गणेश विसर्जनास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून पालिका प्रशासनास तसेच पोलीस प्रशासनास बंदोबस्त मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

गेल्या 20 वर्षांपासून समितीचे कार्यकर्ते गणेशोत्सवात सेवा देण्याचे कार्य करत आहेत. यंदाच्या वर्षी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या 90 स्वयंसेवकानी शहरात स्वच्छता दूत व वाहतूक स्वयंसेवक म्हणून सेवा केली.

विभाग प्रमुख म्हणून सतीश देशमुख, विशाल शेवाळे, राजेश हजारे, लक्ष्मण इंगवले, राजेंद्र कुंवर, उद्धव कुंभार, अजय घाडी, नितीन मांडवे, सुकेश येरूनकर, तेजस सापरिया, राजेश बाबर, बळीराम शेवते, राजेंद्र येळवंडे, शशिकांत इंगळे, संजय शिरसाठ, प्रकाश पानस्कर, उत्तम सादळकर, कडूबाळ शिंदे,राम सुर्वे, भरत उपाध्ये, निखिल कुमावत, किशोर कदम, विजय चौगुले, सोमनाथ पतंगे, संभाजी गुंजाळ,सुभाष माने, लहू पाटील, रामदास सैंदाणे, तेजस सकट यांनी काम पाहिले.

Tathawade : पालिका आणि जागा मालकाच्या वादात रस्त्याचे काम रखडले

वाहतूक व्यवस्था नियोजनासाठी विशेष सहकार्य विजय मुनोत,अर्चना घाळी, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी यांनी केले.

या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे (Pimpri) अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत विशेष जागरूकता दिसून आली. तरुणांनीही मूर्ती दान व पर्यावरण पूरक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला शहरात 4 हजार पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला.

त्याचप्रमाणे दोन लाखापेक्षा जास्त घरघुती गणपतींचे विसर्जन विविध घाटांवर झाले. शहरात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी प्रशासनाने, सामाजिक कार्यकर्त्यांनी हौदांची व्यवस्था केलेली होती. गणेश मूर्तीदानातही वाढ दिसून आली, पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची संख्येमध्ये मोठी वाढ दिसून आली.

परंतु, जमेच्या बाजूबरोबर प्लास्टिक पिशवी वापर व डिजेचा दणदनाटही काही ठिकाणी दिसून आला. स्वच्छता संदेश पोहचविण्यासाठी समितीचे स्वयंसेवक मात्र प्रत्येक उपनगरामध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.