Pimpri: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला अटक

Pimpri: Sexual harassment of a minor girl; The youth arrested आरोपीने त्याचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून मुलीला तो राहत असेलल्या इमारतीच्या गच्चीवर बोलावून घेतले.

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीला इमारतीच्या गच्चीवर बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 8 जून ते 28 जून या कालावधीत इंदिरानगर, चिंचवड येथे घडली.

वृषभ नंदू जाधव (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या पालकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी अल्पवयीन आहे. आरोपीने त्याचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून मुलीला तो राहत असेलल्या इमारतीच्या गच्चीवर बोलावून घेतले.

तिथे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पीडीत मुलीला मोबईल फोन वापरायला दिला. फोन करून मुलीला गच्चीवर बोलावून वारंवार आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like