Pimpri : अष्टपैलू कामगिरीबद्दल खासदार बारणे यांचा सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव सन्मान करण्यात आला.

तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते शनिवारी (दि.19)खासदार बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. कृष्णमूर्ती, प्राईम पाइंटचे अध्यक्ष के. श्रीनिवास उपस्थित होते.

चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. खासदारांची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत केले जाते.

लोकसभेतील 545 खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात खासदार बारणे यांची अष्टपैलू कामगिरी 16 व्या लोकसभेत लक्षवेधी ठरली आहे. सलग पाच वर्षे पुरस्कार मिळवणारे सोळाव्या लोकसभेतील बारणे एकमेव खासदार आहेत. त्यांनी तारांकीत व अतांराकीत असे 1076 प्रश्न मांडले असून 289 वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेतला आहे. तर, सभागृहात 93 % त्यांची उपस्थिती राहिली आहे. या अष्टपैलू कामगिरीनिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांचा सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.