Pimpri : रेशन दुकानदार, कामगार, वाहनचालक यांचाही 25 लाखांचा विमा उतरवावा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – देशात कोरोना या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस नागरिकांची चिंता ही वाढत आहे. कोरोना सारख्या आजारावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणारे महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदार, रेशनिंग दुकानात काम करणारे कामगार, रेशनिंग दुकान ते गोडाऊन वाहतूक करणारे ड्रायव्हर, गाडीवर असणारे हमाल व गोडाऊन मधील हमाल यांना कोरोना साथीच्या काळात पुढील 3 महिन्यांकरिता 25 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळावे. अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे केली आहे.

गजानन बाबर म्हणतात, महाराष्ट्रामध्ये एकूण 52000 रेशनिंग दुकाने आहेत.  दुकानदारांना व त्यांच्या कामगारांना धान्य वितरित करताना रेशनिंग दुकानदारांचा,  रेशनिंग दुकानातील कामगारांचा दैनदिन रेशनिंगच्या कामामध्ये नागरिकांशी संपर्क येतो. परंतु तरी ही रेशनिंग दुकानदार व कामगार नागरिकांना सेवा देत असतात. रेशनिंग दुकान ते  गोडाउन पर्यंत मालवाहतूक करताना गाडीचा ड्रायव्हर, गाडी मधील हमाल, गोडाऊन मधील हमाल यांचाही  नागरिकांशी संपर्क येतो यामुळे यांची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.‌  कोरोनाव्हायरस या साथीच्या काळातही जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणारी रेशनिंग दुकाने सुरू ठेवतात.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये पुढील तीन महिन्यासाठी रेशनिंग दुकानदार, त्यांच्या कामगारांना, तसेच रेशनिंग दुकान ते गोडाऊन वाहतूक करणारे ड्रायव्हर, गाडीवरील हमाल व गोडाऊन मधील हमाल व कर्मचारी वर्ग यांना 25 लाखापर्यंत चे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.