BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानची व्यसनमुक्तीची होळी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – होळीचे औचित्य साधून स्वायत्त महिला प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी आंबेडकर चौक येथील मैदानांवर सामाजिक जनजागृती समाजात घडविण्यासाठी आणि व्यसनमुक्त होण्यासाठी तंबाखू, गुटखा, सिगारेट यांची पाकिटे जाळून होळी करण्यात आली.

यावेळी गुटखा, पानमसाला, खाकर लोग दिखाते है शान, कैंसर को निमंत्रण देकर वो गवाते है जान, तंबाखूची नशा करी अनमोल जीवनाची दुर्दशा, व्यसनामागे पळू नका, तंबाखू मळु नका, आपण सिगारेट पित नाही, पण सिगारेट तुम्हांला पीत आहे असे विविध प्रकारचे फलकांमार्फत समाज व्यसनमुक्त होण्यासाठी संदेश देण्यात आला.

  • यावेळी स्वायत्ता श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप यांनी वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टींचा स्विकार करु, या असा संदेश दिला. तसेच अंजली ब्रम्हे यांनी होळीचे महत्व सांगून होळी साजरा करण्याचे कारण सांगितले. त्यातूनच त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

यावेळी 8ीधर काळे म्हणाले, तंबाखूमध्ये निकोटीन नावाच्या घटकांमुळे कॅंसर होतो. त्यापासून दूर राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्रीधर काळे, कीर्ती नाईक, सुरेखा वाडेकर, उर्मिला चावरे, रागिणी मुदलीयार, निरंजा देशपांडे, कांचन रासकर आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A1
.