Pimpri: पोलीस आयुक्तालयाच्या फर्निचरसह स्थापत्य विषयक कामांसाठी अल्पमुदतीची निविदा

एमपीसी न्यूज – आगामी दोन दिवसात पिंपरी -चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येत आहे. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयासाठी फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी या कामाचा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे. या कामाची अर्थसंकल्पीय रक्कम चार कोटी 64 लाख रूपये इतकी आणि निविदा रक्कम तीन कोटी 87 लाख रूपये इतकी येत आहे. या कामासाठी अल्पमुदतीची म्हणजेच सात दिवसाची निविदा प्रशासनाने काढली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार, चिंचवड – प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास योग्य असून ती इमारत भाड्याने देण्यात यावी. असे पत्र पोलिसांनी 8 मे 2018 रोजी महापालिकेला दिले होते. त्यानुसार, या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास महापालिका सभेनेही मान्यता दिली.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.