Pimpri: फुल बाजारातील 27 गाळे बाजार समितीला भाडेतत्वावर देणार

The 27 floors of the flower market will be leased to the market committee

एमपीसी न्यूज – पिंपरीत उभारण्यात आलेल्या फुलबाजारातील 27 गाळे कृषी उत्पन्न बाजार समितीला भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. 27 गाळ्यांसाठी मासिक भाडेदर 3 हजार 718 रूपये इतका येत आहे. त्यानुसार, बाजार समितीला या गाळ्यांपोटी महापालिकेकडे 1 लाख 98 हजार रूपये भरावे लागणार आहेत.

पिंपरीतील क्रोमा शेजारील सुविधा भुखंड क्रमांक दोनमधील जागेत फुलबाजारासाठी 27 गाळे उभारण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने हा फुलबाजार चालू करण्यासाठी गाळे मिळण्याची मागणी केली आहे.

या जागेत फुलबाजारासाठी उभारलेले 27 गाळे 11 महिन्याचे भाडे घेऊन भाडेकराराने बाजार समितीस देण्याचे प्रस्तावित केले आहे.

नगररचना विभागाचे उपसंचालक यांनी या जागेचा मासिक भाडेदर महापालिका कराव्यतिरिक्त 52.75 रूपये प्रति चौरस फुट कळविला आहे. प्रति गाळ्याचे क्षेत्र 70.478 चौरस फुट इतके आहे.

27 गाळ्यांसाठी 52.75 रूपये प्रति चौरस फुटाप्रमाणे मासिक भाडेदर 3 हजार 718 रूपये इतका येत आहे. 11 महिने भाडेकराराची आणि जीएसटी रक्कम 1 लाख 98 हजार रूपये इतकी येत आहे. त्यानुसार, 11 महिन्याचे आगाऊ भाडे भरून घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.