Pimpri : माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास १६० विद्यार्थ्यांची हजेरी; जुन्या आठवणींना दिला उजाळा

मराठवाडा मंडळ पॉलीटेक्निकमध्ये प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर गीत, प्रात्यक्षिकांसह साजरा

एमपीसी न्यूज – शहरात प्रजासत्ताकदिन विविध देशभक्तीपर गीते, प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमांनी साजरा झाला. रहाटणी येथील महर्षी विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम, गीत, कविता, देशभक्तीचा जागर आदी कार्यक्रमांनी साजरा झाला.

नगरसेविका सविता खुळे आणि शाळेचे संस्थापक धर्मराज पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गीत, कविता सादर केल्या. तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला खवले यांनी केले. रोहिदास पाखरे यांनी आभार मानले.

मराठवाडा मंडळ पॉलीटेक्निकमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांचा दि २६ रोजी वार्षिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सुमारे १६० विद्यार्थ्यांनी हजेरी लावून जुन्या आठवणींना उजाळा दिल्याची माहिती प्राचार्या गीता जोशी यांनी दिली.

पदविका घेऊन आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्याकडून सध्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे अनुभव आणि सल्ले पोहोचवण्यासाठी तसेच आपल्या जुन्या विद्यार्थी-शिक्षकांची भेट घडवून आणणे, हा या स्नेहमेळाव्या मागचा उद्देश होता. औद्योगिक क्षेत्रात होत असणारे बदल आणि शिक्षणपद्धती ह्यावर उपस्थितांची मते नोंदवून घेण्यात आली. प्राचार्यानी संस्थेत होत असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती प्रेसेंटेशनच्या माध्यमातून पोहोचवली.

याप्रसंगी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी पॉलीटेक्निकच्या विविध उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांशी सवांद साधला. जीवनात आनंदी राहण्यासाठी एखादा छंद जोपासून वेळेचे नियोजन करण्याचा मूलमंत्र दिला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.बी.जी.जाधव सरांनी संस्थेसोबत दीर्घकालीन ऋणानुबंध ठेवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या मेळावाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल समन्वयक प्रा.प्रसाद जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संस्थेचे सचिव किशोर मुंगळे सरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.