Pimpri : ‘द युनायटेड ख्रिश्चन युथ असोसिएशन’ची पूर्वनियोजित बैठक रद्द

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे द युनायटेड ख्रिश्चन युथ असोसिएशन यांनी आयोजित केलेली शेवटच्या काळातील संदेश ही अभ्यासपूर्ण बैठक रद्द करण्याचा निर्णय आज (मंगळवारी) एका पत्रकाद्वारे घेण्यात आला. एप्रिल महिन्यात ही बैठक घेण्यात येणार असून लवकरच त्याची तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, तातडीने घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी फ्रान्सिस गजभिव, डेव्हिड काळे, बन्यामिन काळे, अनिता नायडू, राजेश रोचिरमाणी, विल्सन सातपुते, रफाएल दिवे, सचिन भालेराव, शशिकांत पवार, प्रशांत भालशंकर, सीमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.