Pimpri : पिंपरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 02 ऑगस्टला) पिंपरी येथील न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पिंपरी न्यायालय परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावण्यात आली. न्यायालयातील सह न्यायाधीश एन. टी.भोसले , सह न्यायाधीश डी.आर.पठाण , सहन्यायाधीश आर.आर. काळे तसेच सहन्यायाधीश आर. एन. मुजावर , पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश थंबा, सचिव अ‍ॅड. गोरख कुंभार, सहसचिव अ‍ॅडव्होकेट अंकुश गोयल, खजिनदार अ‍ॅड. संतोष मोरे, सदस्य अ‍ॅड. रामचंद्र बोराटे, पूनम राऊत, अ‍ॅड. केशव घोगरे आदी उपस्थित होते.

  • यावेळी न्यायाधीश मे डी.आर पठाण, बारचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील कडूसकर, अ‍ॅड.सतीश गोरडे यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.