Pimpri : उद्योग सेलकडून श्रीरंग बारणे यांना पन्नास हजाराची देणगी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांना आरपीआय आठवले गट उद्योग सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम व उद्योग सेनेच्यातीने पन्नास हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

पिंपरीत झालेल्या हॉटेल अल्पाइन येथे झालेल्या बैठकीत ही देणगी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष शेखलाल नदाफ, पुणे जिल्हा विनोद चांदमारे, पुणे जिल्हा रिपब्लिकन एम्पलॉइज फेडरेशन दत्ता बनसोडे, उद्योजक विशाल भालेराव योगेश जाधव, दीपराज तोंडे, सुशांत पाटील, अनिकेत लुगडे, खाजा भाई शेख, सम्राट जकाते, भारत हुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित मेश्राम म्हणाले की आरपीआय उद्योग सेल महाराष्ट्र प्रदेश ‘नोट भी देंगे और वोट भी देंगे’ असे विचार मांडून त्यांनी श्रीरंग आप्पा बारणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.