Pimpri : युनिव्हर्सल शोटोकान कराटे डो असोसिएशन‌च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या ( Pimpri) संयुक्त विद्यमाने आयोजित स्कूल गेम्स 2023‌ स्पर्धेत युनिव्हर्सल शोटोकान कराटे डो असोसिएशन‌’च्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये पदके पटकवत घवघवीत यश मिळवले आहे.

Pune : नवलेपुलाजवळ ट्रॅव्हल्स व रिक्षाचा अपघात, अपघातात रिक्षातील प्रवाश्याचा मृत्यू

यावेळी स्पर्धेत सहभागी श्वेता लिमण, भक्ती दहिफळे, श्रुती कांबळे, अभिनव चोपडे, आणि वृदुला पवार वुशू, जूडो, तायक्वांदो , किक बॉक्सिंग, आणि सिकई मार्शल आर्ट्स ह्या विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सुसंगत प्रदर्शन केले.

यावेळी खेळाडूंच्या यशासाठी युनिव्हर्सल शोटोकान कराटे डो असोसिएशन चे संस्थापक  संजय पवार, मार्गदर्शक अंकुश तिकोने , आरती मल्ला, प्रमुख प्रशिक्षक प्रफुल प्रधान व मंगेश काटकर यांनी कष्ट ( Pimpri) घेतले.

 

विद्यार्थ्यांची मिळवलेले यश खालील प्रमाणे –  

1)श्वेता लिमण

– वुशू: प्रथम क्रमांक

– जूडो: प्रथम क्रमांक

– तायक्वांदो  : प्रथम क्रमांक

– सिकई मार्शल आर्ट्स: द्वितीय क्रमांक

2)भक्ती दहिफळे

– किक बॉक्सिंग: प्रथम क्रमांक

3)श्रुती कांबळे

– जूडो: द्वितीय क्रमांक

– तायक्वांदो : तृतीय क्रमांक

4)अभिनव चोपडे

– तायक्वांदो : द्वितीय क्रमांक

– किक बॉक्सिंग: तृतीय क्रमांक

5)मृदुला पवार

– किक बॉक्सिंग: द्वितीय क्रमांक

– वुशू: तृतीय क्रमांक

– जूडो: तृतीय क्रमांक

6) संस्कृती भोसले

तायक्वांदो : द्वितीय क्रमांक

7) सार्थक नेवाळे

तायक्वांदो : तृतीय क्रमांक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.