_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Vaccination News: शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना रविवारी ‘या’ केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील  लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस उद्या (रविवारी) देण्यात येणार आहे. 8 केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे. पहिला आणि दुसरा डोससाठीची लाभार्थी क्षमता 100, 100 असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर आज 1429 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर   18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना 15 मे 2021 पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने उद्या रविवारी फक्त  45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘ कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस आठ लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत देण्यात येईल.

#यमुनानगर रुग्णालय  – 45 वर्षांपुढील  100, 100
#तालेरा रुग्णालय –  45 वर्षांपुढील 100, 100
#सावित्रीबाई फुले शाळा भोसरी  – 45 वर्षांपुढील  100, 100

_MPC_DIR_MPU_II

#नवीन जिजामाता रुग्णालय  – 45 वर्षांपुढील 100, 100

#आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ – 45 वर्षांपुढील 100, 100

# खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव – 45 वर्षांपुढील 100, 100

#नवीन आकुर्डी रुग्णालय -45 वर्षांपुढील 100, 100

#आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ – 45 वर्षांपुढील 100, 100

18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.