Pimpri : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोसरीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

हे शिबिर पी.एम.टी. चौकात सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये मधुमेह नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी, कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी आदी तपासणी करण्यात येणार आहे. या मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचा लाभ भोसरी परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांनी केले आहे.

  • नरसिंह तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ ताथवडे आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त ढोल-झांज पथक स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवारी दि. 19 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता सिंहगड ते नरसिंह मंदिर ताथवडे गावठाणापर्यंत शिवज्योत काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हभप आदिनाथ महाराज लाड यांचे कीर्तन होणार आहे.

बुधवारी (दि. 20 फेब्रुवारीला) सायंकाळी चार ते दहापर्यंत ढोल-झांज पथक स्पर्धा होणार आहे. यावेळी राष्ट्रपती पदक सन्मान मिळाल्याबद्दल गणपतराव माडगुळकर व महाराष्ट्र केसरी पै. बालारफिक शेख यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम श्रीनरसिंह मंदिर, ताथवडे गावठाण येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.