Pimpri: राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या जोरावर विजय -अण्णा बनसोडे

महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभारावर आवाज उठविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. याच विकासाच्या जोरावर आपणाला विजय मिळाला असल्याची प्रतिक्रिया पिंपरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. तसेच महापालिकेत भाजपचा भ्रष्ट कारभार असून या विरोधात आपण आवाज उठविणार असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार आणि महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यात दुरंगी लढत झाली. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत चाबुकस्वार यांच्याकडून बनसोडे यांचा अडीच हजारांच्या फरकाने पराभव झाला होता. या पराभवाचा यावेळी बनसोडे यांनी वचपा काढला. तब्बल 19 हजार 778 मतांनी बनसोडे यांनी चाबुकस्वार यांना पराभवाची धूळ चारली.

विजयानंतर बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला आहे. याच विकासाच्या जोरावर आपणाला विजय मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वासाला आपण पात्र ठरलो आहोत. त्यामुळे हा विजय महत्वाचा आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा भ्रष्ट कारभार असून या विरोधात आपण आवाज उठविणार असल्याचेही बनसोडे म्हणाले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.