Pimpri : जागतिक कर्करोग दिन; निदान करून योग्य उपचार घेतले तर कर्करोग बरा होतो

एमपीसी न्यूज – प्राथमिक काळजी घेऊन आणि लवकर निदान करून योग्य उपचार घेतले तर कर्करोग बरा होऊ शकतो. या संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

जागतिक कर्करोग नियंत्रण संस्था यांच्या पुढाकाराने ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या माध्यमातून लोकांमध्ये कर्करोगा बद्दल जागृती निर्माण व्हावी हा या मागचा खरा उद्धेश आहे. लोकांनी कर्करोगा बद्दल प्राथमिक काळजी घावी. जर कर्करोगा ह्या आजाराचे शक्य तेवढ्या लवकर निदान झाले आणि योग्य उपचार केले तर कर्करोग बारा होऊ शकतो, याची जाणीव लोकांना करून देणे गरजेचे आहे.

दरवर्षी साधारण ९.६ दशलक्ष लोक कर्करोगाने मृत्यू पावत असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. जगात होत असलेल्या मृत्यू मध्ये कर्करोग हे दुसरे सगळ्यात मोठे कारण असल्याचे दिसून आले आहे तसेच एक तृतीअंश सामान्य कर्करोग हा प्रतिबंधित केला जाऊ शकतो असे जागतिक कर्करोग नियंत्रण संस्थेचे मत आहे.

कर्करोगाच्या मृत्यूंपैकी 70% मृत्यू मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांमध्ये होतात. लवकर निदान करून योग्य उपचार झाले तर दरवर्षी साधारण ३.७ दशलक्ष लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. जेव्हा जेव्हा शरीराच्या सामान्य पेशींच्या गटामध्ये बदल होतो तेव्हा अनियंत्रित, असामान्य वाढीस ज्याला गाठ म्हणतात ती तयार व्हायला लागते आणि ती हळू हळू वाढत जाते.

रक्ताचा कर्करोग हा ह्या पेक्षा थोडा वेगळा असतो. जर योग्य वेळेत योग्य उपचार केले नाहीत तर गाठी वाढतात आणि आजूबाजूच्या सामान्य ऊतींमध्ये किंवा रक्तप्रवाह आणि लसीका प्रणालीद्वारे शरीराच्या इतर भागात पसरतात आणि पचन संस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम होऊ शकतात किंवा शरीराच्या कार्यावर गंभीर परिणाम करू शकतात.

कर्करोगाची सुरवात प्रथम गाठ नंतर त्याच रूपांतर लसिका गाठी मध्ये झालाय का आणि नंतर त्याच मेटासिस झालाय का म्हणजे तो प्राथमिक स्टेज वरून सर्व शरीर भर पसरला आहे का अश्या तीन (Tumor, Nodes, आणि Metastasis) पातळी वर त्याचे निदान केले जाते.कर्करोगाचा उपचार करण्यासाठी सर्जेरी, केमोथेरपी, रेडिओ थेरपी,इंमुन थेरपी, हार्मोन थेरपी आणि जीन थेरपी सारखे पर्याय आज वैदकीय शास्त्रात उपलब्ध आहेत.

अलीकडे कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढले आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनांचा व सर्वीकल कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे तसेच पुरुषांमध्ये किडणी, यकृत व तोंडाचा होणारा कर्करोग हे प्रामुख्याने दिसून येतात. बदलेली जीवन शैली आणि दररोज होणारी धावपळी मुळे आपण आरोग्याकडे फार कमी लक्ष देत आहोत आणि गंभीर आजारांना आमंत्रण देतो.

कर्करोग दिनाच्या पार्शवभूमी वर आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे. तंबाकू चे आणि दारूचे व्यसन करू नये ज्यामुळे यकृत व फुफ्फुस ला सगळ्यात जास्त हानी पोहचते. योग्य आहार आणि पोषक तत्वे आपण दररोज आपल्या शरीराला पुरवली पाहिजेत, शारीरिक व्यायाम आणि आजूबाजूला स्वच्छता ठेऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.