Pimpri : उन्हाळ्यात शिळे अन्न ठरू शकते घातक

एमपीसी न्यूज:- सध्या उन्हाची झळा इतक्या वाढल्या (Pimpri) आहेत की, उलटी मळमळ, ऍसिडिटी गॅस , पोटदुखी, असे त्रास होतात. मात्र अनेक महिला उन्हाळ्यात बराच काळ फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न  खातात. त्यामुळे फूड पॉइजनिंग, पोटदुखी, अतिसार असे त्रास होतात.
 शहरामध्ये नोकरीला जाणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र नोकरीला जाण्यासाठी धावपळ करायला लागते.यामुळे वेळ मिळत नसल्यामुळे अनेक महिला फ्रिजमध्ये जास्त अन्न बनवून ठेवतात. तसेच शिजवून ठेवलेले शिळे अन्न फ्रीजमधून काढून वापरत असतात. त्यामुळे विविध आजार जडतात.

Pimpri News : महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक – काशिनाथ नखाते

तसेच  जर चार किंवा पाच तासापूर्वी अन्न तयार केले असेल तर ते खाण्यास योग्य आहे.  खूप वेळ आधी तयार केलेले अन्न आरोग्यास घातक ठरू शकते अनेक नागरिकांना फ्रिजमध्ये कापलेले फळे खाण्याची सवयी असते. त्यामुळे विविध त्रास होऊ शकतात. असे आहारतज्ञ सांगतात.

हे पदार्थ खाणे टाळावे
उन्हाळ्यात अंडी, तांदूळ, सीफुड, आणि प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ, शिळे खाणे टाळावे. या सर्व पदार्थांवर बॅक्टेरिया पटकन वाढतात.
उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करावे
उन्हाळ्याच्या दिवसात ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माचे धन्य खाणे गरजेचे (Pimpri) आहे. त्यासह गाईचे दूध, वरण-भात, खिचडी अशा हलक्या पदार्थांचे सेवन करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.