Pisces – Annual Horoscope 2021-2022: मीन राशीच्या व्यक्तींना मिळेल सहकाऱ्यांची मदत

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. मीन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखन केले असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्याचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

मीन : सहकाऱ्यांची मदत मिळेल

मीन राशीचक्रातील शेवटची रास असून जलतत्वाची, टद्रिस्वमावाची, स्त्री राशी असून या राशीचा स्वामी गुरु असून या राशीचे चिन्ह विरूद्ध दिशेला तोंड असणारे मासे आहे. भावनाप्रधान व भावुकता आपल्या स्वभावात असल्यामुळे आशा-निराशा, यश-अपयश, विचाराची गती उलटसुलट असते.

मनाची चंचलता, गोरगरीबांची दया, अनाथ लोकांना मदत करणारी, दयाळू, मायाळू, सर्वांशी जुळवून घेण्याची क्षमता या राशीच्या व्यक्तींमध्ये आढळते. परमेश्वरी ओढ, जप, तप, पूजा-अर्चा या गोष्टींकडे जास्त कल असतो. सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध सुसंस्कृत व निर्मळ असतात. स्वभावाने शांत व परोपकारी वृत्ती या व्यक्तींमध्ये असते.

मीन राशीत पूर्वाभद्रा, उत्तराभाद्रपदा, रेवती ही नक्षत्रे येतात. मीन रास पूर्वाभाद्रा नक्षत्रातील व्यक्ती हशार, धनी, धार्मिक, मधुर भाषा बोलणारी, सौम्य व सात्विक व्यवहार असणारे असतात.

मीन रास उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असणारी व्यक्ती न्यायप्रिय, मेहनती, त्यागी, महत्वाकांक्षी, ध्यान व योगात आवड असणारी, श्रद्धाळू, तर्कशुद्ध बोलणारी, योग्यता संपन्न, परोपकारी व श्रद्धावान असतात.

मीन रास रेवती नक्षत्रामधील व्यक्ती उत्तम स्मरणशक्ती, उंचीने कमी, हुशार, निस्वार्थी, कायदे पंडित, ईश्वरावर श्रद्धा ठेवून सत्कर्मी काम करतात. तर अशा धर्मावर श्रद्धा व विश्‍वास असणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

राशीच्या व्ययस्थानातून गुरुचे होत असून हे गुरूचे भ्रमण मध्यम स्वरूपाची फले प्राप्त करणारे राहील. मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मित्रांची सहकार्याची मदत घ्यावी लागेल. शिक्षण, परदेशगमन यामध्ये पैसा खर्च होईल.

अध्यात्मिक, धार्मिक, तीर्थयात्रा होतील. एकत्र कुटुंब विभाजन होण्याचा प्रयत्न होईल. वडिलोपार्जित इस्टेट, संपत्ती यांचे वाटप होण्याचा कालखंड विद्यार्थी वर्गांना जास्त कष्ट घ्यावे लागतील. नोकरीमध्ये बदली अथवा निवृत्ती यांसारख्या घटना घडतील.

पायाचे विकार संभवतात. वृद्ध व्यक्तींनी आरोग्याची दक्षता घ्यावी. एकंदरीत गुरुचे भ्रमण हे कंपनीचे सेक्रेटरी, डॉक्टर्स, रिप्रेझेंटेटीव्ह, हॉस्पिटल्सचे मुख्य अधिकारी, विमा क्षेत्रातील नेव्ही, प्रकाशक, दलाल, ब्रँड अम्बेसिटर यांना लाभाचे प्रमाण कमी असले तरी प्रसिद्धी होईल.

राशीच्या लाभस्थानातून शनिचे भ्रमण होत असून कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्णय लागतील. जुने येणे वसुल होईल. जुन्या मित्रांची मदत होऊन त्यातून मार्ग मिळेल. मोठी कर्ज मिळतील.

वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागतील. २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ राशीच्या व्ययस्थानातून शनिचे भ्रमण होणार असून या कालखंडात साडेसातीची मिनी ट्रायल अनुभवाल.

आपल्या वाणीवर संयम ठेवावे लागेल. कौटुंबिक लोकांकडून मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्यावी. राशीच्या तृतीय व भाग्यातून राहू केतूचे भ्रमण होत असून मार्च २०२२ नंतर द्वितीय व अष्टम स्थानातून होणार आहे.

मोठे धाडसी निर्णय घ्याल. नोकरीत अस्थैर्य कमी होईल. शत्रूवर विजय मिळेल. मानसिकता ठीक राहील. मात्र भावंडाची काळजी घ्यावी लागेल.

नातेवाईक व कुटुंबाशी दुरावा संभवतो. मोठ्य शक्यता राहील. हर्षलचे भ्रमण द्रितीय स्थानातून भ्रमण व्ययस्थानातून व प्लुटोचे भ्रमण लाभातून होत आहे. बोलताना वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. अनपेक्षित लाभ अनपेक्षित खर्च अध्यात्म व उपासना यातून समाधान प्राप्त होईल.

शुभरंग : गुलाबी, निळसर, पोपटी

शुभरत्न : प्रवाळ व पुष्कराज रत्नाचा वापर केल्यास उत्तम.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३०.

भाग्यकारक वयोवर्षे : ९,१८,२६,३६,४४,४५.

उपासना व उपाय : आपण गणपती, उपासना लक्ष्मी नारायण उपासना केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर औदुंबर वृक्षाची पूजन, अन्नदान करावे. मसूर डाळ व रंगीत वस्त्रे मदिरात दान करावीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.