Aquarius – Annual Horoscope 2021-2022: कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कभी खुशी, कभी गम

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात कुंभ राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. कुंभ राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखन केले असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

कुंभ : कभी खुशी, कभी गम

कुंभ राशीचक्रातील अकरावी रास असून स्थिर तत्वाची वायू राशी असून पुरुषस्वभावी आहे. या राशीचा स्वामी शनि असून काहींच्या मते हर्षल ग्रहाकडे प्रतिनिधीत्व आहे. या राशीच चिन्ह खांद्यावर कुंभ घेतलेला व चालत राहणारा पुरुष असे प्रकारची ज्ञान लालसा, सत्याची आवड, कोणतेही काम मनापासून तळमळीने करणे हा गुण दर्शवितो.

या राशीच्या व्यक्तींवर चिंतन, मनन, तत्वज्ञानेचं संस्कार झालेले असतात. त्यामुळे माणसाने माणसाबरोबर माणुसकीने वागल्यास सर्व कामे पूर्ण होतात असे विचार करणारी ही रास आहे. या राशीच्या व्यक्ती चांगल्या परंपरा, संस्कृती, अध्यात्म जपणारी असतात.

अध्यात्म, व विज्ञान यांची उत्तम सांगड घालून एक नवी दिशा समाजाला देणाऱ्या या राशीच्या व्यक्ती आढळतात. नवनवीन शोध, मित्रपरिवार मोठा, अनेक व्यक्तींशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्ती असतात. या राशीचे व्यक्तिमत्व स्वयंभू. उच्च विचार, दिलेला शब्द पाळणारे असे असते.

कुंभ राशीमध्ये धनिष्ठा, शततारका व पूर्वाभाद्रपदा ही तीन नक्षत्रे येतात. कुंभ धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती अनेक मार्गाने अर्थप्राप्ती होऊन सौख्य संपादन करेल. महत्वाकांक्षी, साहसी, संगीताची आवड, वाक्चातुर्य, हजरजबाबी, बुद्धिमत्ता प्रचंड असते.

कुंभ रास शततारका नक्षत्र असणाऱ्या व्यक्ती कल्पक, धूर्त, व्यसनी, विषयसक्त असतात. व लोभाला बळी पडणारे असतात. हे मद्य, मांस, पशु, पक्षी यांचा व्यापार करणारे असतात.

कुंभ रास पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असणारे व्यक्ती विद्याव्यासंगी, संशोधक स्त्रीवश, धूर्त काहीवेळा कठोर अंत:करणाचे असतात. तर अशा बुद्धिमान कुंभ राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

राशीच्या प्रथम स्थानातून गुरुचे भ्रमण होत असून जो काही . गेल्यावर्षापासून मानसिक व शारीरिक त्रास झाला तो आता काही प्रमाणात कमी होईल. विचारामध्ये प्रगल्मता वाढेल. नवीन उमेद उत्साह येईल. धार्मिक वृत्ती वाढेल. तीर्थयात्रा होतील.

विवाह इच्छुकांचे विवाह होतील. भागीदारीमध्ये व्यवसाय केल्यास फायदेशीर राहील. अध्यात्मिक गुरु यांची भेट होईल. त्यांचा अनुग्रह प्राप्त होईल. नोकरी व्यवसायात पैशाची देवाणघेवाण करताना सतर्क रहावे.

मोठी गुंतवणूक करण्याचे टाळावे. सल्लागार, संशाधेक,  शास्त्रजञ, दळणवळण चक्रातील व्यक्ती हॉटेल व्यावसायिक यांना हे वर्ष विशेष फायदेशीर राहील.

राशीच्या व्ययस्थानातून शनिचे भ्रमण होत असून साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. बाराव्या शनिमुळे आर्थिक चिंता निर्माण होईल. मात्र कर्ज फेडण्यासाठी कालखंड चांगला राहिल. दूरचे प्रवास खर्चामध्ये वाढ, अधून मधून आरोग्याच्या तक्रारी यासारखे घटना घडतील.

विशेषत: अयोग्य काम अथवा जामीन मध्यस्थी या गोष्टींपासून दूर राहावे. घरातील वृद्ध व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. २९ एप्रिल २०२२ ते १२ जुले २०२२ या कालखंडात घेतलेले निर्णय चुकू शकतात.

उगाच एखादी चिंता मागे लागेल. नोकरी व्यवसायात कष्ट व दगदग वाढेल. एकंदरीत शनिचे भ्रमण हे आपणाला कभी खुशी कभी गम असे राहील.

राशीच्या चतुर्थ व दशम स्थानातून राह केतूचे भ्रमण होत असून व मार्च २०२२ नंतर तृतीय व भाग्यातून होणार आहे. खर्च वाढतील. मात्र लाभही वारंवार होतील. धाडसी कामे, कर्तृत्व सिद्ध कराल.

नोकरी व्यवसायात मान- अपमानाचे प्रसंग उदभवतील. हर्षलचे भ्रमण तृतीय स्थानातून, नेपच्यूनचे भ्रमण आपल्याच राशीतून व प्लुटोचे भ्रमण व्ययस्थानातून होत असून अनपेक्षित कामे पूर्ण होतील. काहींना परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील.

शुभ रंग : निळा, आकाशी, पांढरा.

भाग्यरत्न : आपण डायमंड व पांढरा पुष्कराज या रत्नांचा वापर केल्यास उत्तम राहील.

शुभदिनांक : ८, १७, २६.

भाग्यकारक वयोवर्षे : १५,२४, २५, ३२, ४२, ५१, ६०, ६४, ७१.

उपासना व उपाय : आपण कुलदेवतेची उपासना केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर वृद्ध, अपंग, आजारी यांची सेवा करावी. मंदिरात बदाम, धने दान द्यावे. अंगावरती सोन्याच्या वस्तूंचा वापर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.